आगामी उपक्रम


२०
डिसेंबर

आदर्श व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने
‘राष्ट्रसाधक प्रशिक्षण शिबिर’
आयोजित करण्यात आले आहे.
कालावधी : दि.२०, २१, २२ डिसेंबर २०२४
अधिक माहिती
नावनोंदणी करावी

१४
डिसेंबर

भगवान श्रीदत्तात्रेय जयंती महोत्सव
मार्गशीर्ष शु. १४ श्रीशके १९४६; शनिवार, दिनांक १४ डिसेंबर २०२४
रोजी श्रीक्षेत्र दत्तधाम, हेळवाक येथे संपन्न होणार आहे.
Add to my calendar

वृत्तांत

परमपूज्य सद्‍‍गुरु
श्री. अनिरुद्धदादा आगटे

युवा साधक शिबीर, जून २०२४


‘श्रीपाद सेवा मंडळ’ आणि ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन’ व ‘श्रीसंत मुक्ताई ज्ञानपीठ प्रकल्प’ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा साधकांचे शिबिर शनिवार व रविवार, दिनांक २२ व २३ जून २०२४ असे दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आले होते. आळंदी येथे श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाच्या वास्तूत प.पू. सद्‍‍गुरु श्री. अनिरुद्धदादा आगटे यांच्या परममंगल उपस्थितीत हे शिबिर अत्यंत उत्साहाने व आनंदाने संपन्न झाले.

डॉ. श्री. नरेंद्र पेंडसे

डॉ. सौ. अरुणा पेंडसे

आपले आरोग्य - एक कार्यशाळा

'आपले आरोग्य' ह्या विषयावर, दिनांक ४ फेब्रुवारी २०२४ रोजी, श्रीसंत निवृत्तीनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी येथे एक कार्यशाळा संपन्न झाली. ह्या कार्यशाळेला पुणे, मुंबई आणि इतर काही केंद्रातील साधकांनी उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला.

कार्यक्रमातील काही क्षण चित्रे

|| श्रीगुरुगीता अभ्यासवर्ग ||


श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन व श्रीसंत मुक्ताई विद्यापीठाने, श्रीगुरुगीतेची माहिती व मर्म उलगडून दाखवण्यासाठी, श्रीपादनिवास पुणे येथे, “श्रीगुरुगीता अभ्यासवर्गाचे” आयोजन केले होते. दिनांक १३ मे रोजी, सकाळी १० ते ११:३० व सायंकाळी ५ ते ६:३०, तसेच १४ मे रोजी सकाळी १० ते ११:३० या वेळांमध्ये, ही व्याख्यान-सत्रे आयोजित केली होती. परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादा कवडे यांच्या संकल्पाप्रमाणे व त्यांच्याच परमकृपेने, साक्षेपी अभ्यासक व उत्तम व्यासंग असलेले ज्येष्ठ साधक, श्री. श्रीकांत दामले, यांनी या सत्रांत व्याख्यान दिले...

श्री. श्रीकांत दामले

श्री. श्रीकांत दामले

|| श्रीएकनाथी भागवत अभ्यासवर्ग ||


श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन व श्रीसंत मुक्ताई विद्यापीठाने, श्रीपादनिवास पुणे येथे, “श्रीएकनाथी भागवत अभ्यासवर्गाचे” आयोजन केले होते. दिनांक २७ फेब्रुवारी २०२२ ते ०५ जून २०२२ मध्ये एकूण १४ सत्रे आयोजित केली होती. परमपूज्य सद्गुरु श्री. शिरीषदादा कवडे यांच्या संकल्पाप्रमाणे व त्यांच्याच परमकृपेने, साक्षेपी अभ्यासक व उत्तम व्यासंग असलेले ज्येष्ठ साधक, श्री. श्रीकांत दामले, यांनी या सत्रांत व्याख्यान दिले...

अधिक माहितीसाठी कृपया वरील स्लाईडवर क्लिक करा!

अंतर्गत शाखा
Image 2

श्रीसंत मुक्ताई
ज्ञानपीठ

श्रीसंत मुक्ताई
ज्ञानपीठ


जग‍द्‌गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे ही चालती बोलती ज्ञानपीठेच होती. “ज्ञान ज्या ठिकाणी गंगौघासारखे स्वच्छ, सुंदर व अफाट अन् मुक्तपणे उपलब्ध असेल; ते ज्ञानपीठ खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वांगसुंदर व उचित स्मारक ठरेल. तत्वज्ञान व संत वाङ्गमय शिकण्याची व त्याद्वारे आत्मोद्धार करून घेण्याची कळकळ असणारे साधक व त्यांना निरहंकारी व मुमुक्षुत्वाने ज्ञान देण्याची इच्छा असणारे ज्येष्ठ अभ्यासक यांच्यासाठी हे चिंतनाचे समग्र व्यासपीठ असेल. जगातील सर्व धर्म संप्रदायांचे व तत्वज्ञानाच्या विविध प्रणालींचे हवे ते शिक्षण तसेच वैदिक व संत साहित्य ही प्रधान आस ठेवून, त्या साहित्याच्या अनुषंगाने शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे.”
Image 1

e-Library

e-Library


साधारणपणे डिसेंबर, २०१९ च्या सुमारास परमपूज्य सद्‌गुरू श्री मामासाहेब देशपांडे व परमपूज्य सद्‌गुरू मातोश्री सौ शकुंतलाताई आगटे यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्‌गुरू तीर्थरूप श्री शिरीष दादा कवडे आणि परमपूज्य सद्‌गुरू श्री अनिरुद्ध दादा आगटे यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाने ई-लायब्ररी या प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रामुख्याने सनातन वैदिक धर्मातील दुर्मिळ हस्तलिखिते व ग्रंथ व हे उत्तरोत्तर कागदांवर टिकेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्याचा संगणकीय सुविधांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून समस्त समाजाचा फायदा होत असेल, तर उत्तम असा विचार या प्रकल्पामागे होता.
Image 3

श्रीसंत निवृत्तिनाथ
महाराज ग्रंथालय

श्रीसंत निवृत्तिनाथ
महाराज ग्रंथालय


श्री माउलींच्या कृपाप्रेरणेने प.पू.श्री.मामांनी स्थापन केलेल्या ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने आळंदीच्या वैभवात मोठी भर घालणारा एक प्रकल्प येथे आकारास आला आहे. ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ हाच तो भव्य प्रकल्प. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय. बऱ्याच वेळा पुस्तक देवघेव केंद्र इतकीच ग्रंथालयाची ओळख असते. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय मात्र याला अपवाद आहे. हे नुसते ग्रंथालय नसून एक संपन्न अभ्यासकेंद्रही आहे. दुर्मिळ व प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाने अडीच लाख ग्रंथसंख्येचे उद्दिष्ट ठेवलेले असून लवकरच ते पूर्णत्वाला जाईल.

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

Slider