आगामी उपक्रम
अधिक माहितीसाठी कृपया वरील स्लाईडवर क्लिक करा!
श्रीसंत मुक्ताई
ज्ञानपीठ
श्रीसंत मुक्ताई
ज्ञानपीठ
जगद्गुरू संत श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे ही चालती बोलती ज्ञानपीठेच होती. “ज्ञान ज्या ठिकाणी गंगौघासारखे स्वच्छ, सुंदर व अफाट अन् मुक्तपणे उपलब्ध असेल; ते ज्ञानपीठ खऱ्या अर्थाने त्यांचे सर्वांगसुंदर व उचित स्मारक ठरेल. तत्वज्ञान व संत वाङ्गमय शिकण्याची व त्याद्वारे आत्मोद्धार करून घेण्याची कळकळ असणारे साधक व त्यांना निरहंकारी व मुमुक्षुत्वाने ज्ञान देण्याची इच्छा असणारे ज्येष्ठ अभ्यासक यांच्यासाठी हे चिंतनाचे समग्र व्यासपीठ असेल. जगातील सर्व धर्म संप्रदायांचे व तत्वज्ञानाच्या विविध प्रणालींचे हवे ते शिक्षण तसेच वैदिक व संत साहित्य ही प्रधान आस ठेवून, त्या साहित्याच्या अनुषंगाने शिक्षण घेण्यासाठी या ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे.”
e-Library
e-Library
साधारणपणे डिसेंबर, २०१९ च्या सुमारास परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे व परमपूज्य सद्गुरू मातोश्री सौ शकुंतलाताई आगटे यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने तसेच परमपूज्य सद्गुरू तीर्थरूप श्री शिरीष दादा कवडे आणि परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध दादा आगटे यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाने ई-लायब्ररी या प्रकल्पाला सुरुवात झाली. प्रामुख्याने सनातन वैदिक धर्मातील दुर्मिळ हस्तलिखिते व ग्रंथ व हे उत्तरोत्तर कागदांवर टिकेल की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सध्याचा संगणकीय सुविधांचा व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून समस्त समाजाचा फायदा होत असेल, तर उत्तम असा विचार या प्रकल्पामागे होता.
श्रीसंत निवृत्तिनाथ
महाराज ग्रंथालय
श्रीसंत निवृत्तिनाथ
महाराज ग्रंथालय
श्री माउलींच्या कृपाप्रेरणेने प.पू.श्री.मामांनी स्थापन केलेल्या ‘श्रीज्ञानदेव सिद्धबेट तपोवन ज्ञान-योग-अध्यात्म विद्यापीठ प्रतिष्ठान’ या संस्थेच्या वतीने आळंदीच्या वैभवात मोठी भर घालणारा एक प्रकल्प येथे आकारास आला आहे. ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय’ हाच तो भव्य प्रकल्प. महाराष्ट्रातील समृद्ध ग्रंथालयांच्या परंपरेतील एक उत्तम ग्रंथालय म्हणजेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय. बऱ्याच वेळा पुस्तक देवघेव केंद्र इतकीच ग्रंथालयाची ओळख असते. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय मात्र याला अपवाद आहे. हे नुसते ग्रंथालय नसून एक संपन्न अभ्यासकेंद्रही आहे. दुर्मिळ व प्राचीन ग्रंथांचे जतन करण्याचे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालयाने अडीच लाख ग्रंथसंख्येचे उद्दिष्ट ठेवलेले असून लवकरच ते पूर्णत्वाला जाईल.