|| श्री ||

कऱ्हाड येथे संपन्न झालेल्या प.प.सद्‌गुरु श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी
महोत्सवाचा आणि प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.मामा महाराजांच्या जयंती महोत्सवाचा वृत्तांत


‘श्रीपाद सेवा मंडळा’च्या कऱ्हाड केंद्रात, प.प.सद्‌गुरु श्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि प.पू.सद्‌गुरु योगिराज श्री.मामा महाराजांची जयंती यानिमित्त बुधवार व गुरुवार दिनांक १५ आणि १६ जुलै २०२६ असे दोन दिवस मोठ्या हर्षोल्हासाने महोत्सव साजरा करण्यात आला. प.पू.सद्‌गुरु श्री.शिरीषदादा व प.पू.सद्‌गुरु श्री.अनिरुद्धदादा यांच्या अमूल्य मार्गदर्शनाने या संपूर्ण महोत्सवाच्या कार्यक्रमाची रूपरेषा आधीच आखण्यात आली होती आणि त्याप्रमाणे नेटके पूर्वनियोजनही करण्यात आले होते. या भक्तिमय सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी आणि सद्‌गुरुदर्शनाच्या ओढीने पुणे, मुंबई, चिपळूण, गोवा, कोल्हापूर, लातूर, जळगांव जामोद, बेळगांव अशा विविध भागांतून साधक-भक्त कऱ्हाड येथे आले होते.

या महोत्सवाचे मुख्य ठिकाण असलेल्या ‘श्रीसमर्थ मल्टिपर्पज हॉल’ येथे आवश्यकतेनुसार काही साधकमंडळींची राहाण्याची सुयोग्य व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी हॉलच्या बाहेरील विस्तीर्ण पटांगणात प्रशस्त पार्किंगचीही सोय करण्यात आली होती. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर मंडप उभारण्यात आला होता, तिथे रेखाटलेली सुरेख रांगोळी येणाऱ्या प्रत्येकाचे मन वेधून घेत होती. या मंडपात भाविकांच्या मार्गदर्शनासाठी स्वागतकक्ष सज्ज होता तसेच ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या ग्रंथांचा, ‘अमृतबोध’ मासिकाचा आणि श्रीक्षेत्र आंबेरी ‘तपोवन’ येथील विविध सेंद्रिय उत्पादनांचा असे तिन्ही स्टॉल्स अभ्यागतांना आकर्षित करीत होते. याशिवाय सभागृहात ठिकठिकाणी ‘श्रीवामनराज प्रकाशना’च्या नूतन व पुनर्मुद्रित ग्रंथसंपदेची थोडक्यात माहिती देणारे फलक लावण्यात आले होते.

व्यासपीठावर सकलऐश्वर्यमंडित श्रीदत्तपरंपरा, प.प.श्रीमद्‌ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि प.पू.सद्‌गुरु श्री.मामा महाराज यांच्या नित्यमंगल प्रतिमा स्थापित करण्यात आल्या होत्या. या देखण्या प्रतिमांना अर्पण केलेल्या कोमल, सुवासिक फुलांच्या माळा आणि मनमोहक पुष्पसजावटीमुळे संपूर्ण सभागृहात एक अलौकिक प्रसन्नता आणि मांगल्य भरून राहिले होते.

संक्षिप्त चलतचित्र

उत्सवातील काही क्षण चित्रे

संस्थेत येण्यासाठी गुगल नकाशा

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.