अभ्यास सत्र क्रमांक २ दिनांक ०६. ०३. २०२२
विषय
मायेचे स्वरूप,
मायेवर विजय मिळवण्याचे उपाय,
सद्गुरू आणि सत्शिष्य लक्षणे,
अभक्तांची गती
|| श्री सद्गुरु बोधवचन ||
कुठल्याही स्थितीत, मनात आलेले सद्विचार हे टाळू नयेत.
स्वत:च्या चुका निर्भयपणे कबूल कराव्यात.
चुका दुरुस्त करण्याच्या आड अहंकार येऊ देऊ नये.
माया म्हणजे भास ;विषयासक्ती आणि त्यातून उत्पन्न होणारे मोहआदि षडविकार मायेस विस्तारण्यास मदत करतात.
अहंकार रहित ज्ञान हे मायेवर विजय मिळवण्यास उपयुक्त ठरते.
परंतु प्रत्येकालाच ज्ञानी होता येते असे नाही. असे निराभिमानी अज्ञानी गुरुभक्तीच्या आधारे मायेवर विजय मिळवू शकतात.
सत्संगामुळे अज्ञानाचा नाश होतो उन्नती होते.
मथितार्थ एकच,उत्तम शिष्याने नित्य साधन करून गुरुशरण व्हावे, अनन्य व्हावे, सत्संग साधावा , ज्ञानाने किंवा भक्तीने मायेवर विजय मिळवावा आणि मोक्ष साधून घ्यावा."