सद्‍‍गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज व त्यांची भावंडे ही चालती-बोलती, आदर्श ज्ञानपीठेच होती. आजच्या काळात शुद्ध, निर्मळ, अचूक ‍ज्ञानभांडार दुर्मिळ झाले आहे. ते ज्या ठिकाणी मुक्तपणे सर्वांना उपलब्ध होईल असे ज्ञानपीठ निर्माण झाल्यास ती या संतमंडळींनी केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याप्रति एका अर्थाने आदरांजली ठरेल. याच उदात्त हेतूने स्थापन झालेले ‌‘श्रीसंत मुक्ताबाई ज्ञानपीठ’ हे, संतवाङ्गमय व तत्त्वज्ञानाच्या अभ्यासातून आत्मोद्धारासाठी तळमळणारे साधक आणि त्यांना मुक्तहस्ते ज्ञान देणारे ज्येष्ठ अभ्यासक, अशा उभयतांसाठी उत्तम व्यासपीठ आहे. वैदिक धर्म व संतसाहित्य हे विषय प्रधान मानून त्यांच्या व रुचीप्रमाणे इतरही सर्व धर्म संप्रदायांच्या प्रणालींचा, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी या ज्ञानपीठाची स्थापना करण्यात आली आहे. खरेतर प्रचलित सर्व धर्म हे एका सनातन वैदिक धर्माचेच भाग असून अंतिमतः ते सर्व आत्मज्ञानाकडेच नेणारे आहेत. एकाच परमतत्त्वाची ती वैविध्यपूर्ण अंगे आहेत असे म्हणता येईल. त्यानुसार ज्यास जो मार्ग आवडेल त्याचा अंगिकार करून निष्ठेने त्याचे आचरण करता यावे यासाठी हे ज्ञानपीठ कार्यरत आहे.

Key Objectives

१) सर्वच वाङ्मय प्रकारांची व त्यातही प्रामुख्याने संतवाङ्गमय, वेद, शास्त्र, पुराणे, उपनिषदे, विद्या, कला, हिंदू धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान, आद्य श्रीशंकराचार्य व श्रीसंत ज्ञानेश्वर माउलींचे समग्र वाङ्गमय, विश्वकोश, संदर्भग्रंथ, विविध परंपरा-संप्रदायांतील आजमितीस उपलब्ध असलेली हस्तलिखिते व पुस्तके एकत्रित करणे. ‌‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालया’त अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांचे Digitization करणे. Digitized e-Library च्या माध्यमातून संकलितपुस्तकांचे योग्य जतन संवर्धन करणे.
   * ‘श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालया’त अभ्यासकांना पहिल्या टप्प्यात इंट्रानेट द्वारे e-Library उपलब्ध करून देणे.
   * क्रमाक्रमाने पुढील टप्प्यात जगभरातील अभ्यासकांना इंटरनेट सुविधेने ही e-Library उपलब्ध करून देणे.
२) जगभरातील सर्व e-Libraries आपल्या e-Library सोबत जोडण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेणे. त्याद्वारे सर्वत्र विखुरलेला माहितीचा दुर्मिळ साठा सर्वांना सहजतेने नाममात्र मोबदल्यात एकाच छताखाली उपलब्ध करणे.
३) संतवाङ्गमयाच्या सखोल अभ्यासाकरिता त्या क्षेत्रातील विविध मान्यवर जाणकारांकडून संशोधन प्रकल्प राबविणे. शिबिरार्थींच्या आवडीच्या विषयांनुसार अनेकविध मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे. हिंदुधर्मातील स्तोत्रे, सूक्ते, पवमान, रुद्रपठण यांच्या संथा देणे तसेच श्रीज्ञानेश्वरी, श्रीभगवद्गीता, श्रीदासबोध, श्रीएकनाथी भागवत, श्रीयोगवासिष्ठ अशा प्रामाण्य ग्रंथांचे अभ्यासवर्ग घेणे. पुढील अभ्यासाकरिता प्रोत्साहन देण्यासाठी त्यावर परीक्षा, डिप्लोमा, डिग्री अभ्यासक्रम आयोजित करून प्रमाणपत्रे देणे.
४) संतवाङ्गमयाच्या प्रचार व प्रसारासाठी मर्मज्ञ अभ्यासकांची व्याख्याने, प्रवचने, कीर्तने, वासंतिक वर्ग-शिबिरे विविध ठिकाणी आयोजित करणे आणि त्यांच्या कार्याबद्दल यथोचित सत्कार-सन्मान करणे.
५) आध्यात्मिक कीर्तन-प्रवचनांचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग्स जतन करून जिज्ञासू अभ्यासकांना उपलब्ध करून देणे.
६) ज्ञानपीठातील संशोधनातून अनेक मार्मिक ग्रंथ प्रकाशित करणे आणि संतवाङ्गमय घरोघरी पोचवण्यासाठी अल्प किंमतीत उपलब्ध करणे.
७) सांप्रदायिक वारकरी व नारदीय कीर्तन तसेच गुरुकुल पद्धतींचे प्रशिक्षण देऊन सांस्कृतिक वारशाचे जतन-संवर्धन करणे.
८) ज्ञानपीठाच्या वरील सर्व उद्दिष्टांनुसार चालणाऱ्या कार्याचा अध्यात्म, तत्त्वज्ञान, संशोधन, संतसंप्रदाय, वारकरी संप्रदाय, समाजसेवा अशा क्षेत्रांतील तज्ज्ञांना परिचय करून देणे व पुढील कार्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे.

१. सर्व विषय प्रामुख्याने संतवाङ्गमय, वेद, वेदांगे, पुराणे, उपनिषदे, विद्या, कला तसेच हिंदू धर्मातील अव्दैत तत्वज्ञान, आद्य शंकराचार्य व श्री
   ज्ञानेश्वर माउली यांचे समग्र वाङ्गमय, श्रीदासबोध, श्रीभगवद्‍गीता, श्रीएकनाथी भागवत , विश्वकोश तसेच श्रीदत्तसंप्रदाय,
   श्रीनाथसंप्रदाय याबद्दलची समग्र हस्तलिखिते व पुस्तके एकत्र करणे, त्यांचे योग्य जतन करणे. तसेच श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज
   ग्रंथालयात त्यांचे Digitization करून Digitized e-Library चे निर्माण करणे.
   * अभ्यासकांना श्रीसंत निवृत्तिनाथ महाराज ग्रंथालय, आळंदी येथे e-Library इंट्रानेट द्वारे पहिल्या टप्यात उपलब्ध करून देणे.
   * कालांतराने विश्वभरातील अभ्यासकांना e-Library इंटरनेट सुविधेने उपलब्ध करून देणे.
२. जगभरातील समस्त ई-लायब्ररीज् आपलया ई-लायब्ररीला जोडून माहितीचा जो दुर्मिळ साठा जगभरात अनेकविध ठिकाणी पसरला आहे,
   तो एका क्लिकवर, एका पोर्टलवर समस्त साधकांना व अभ्यासकांना सहजतेने व नाममात्र मोबदल्यात उपलब्ध करून देणे.
३. संस्थेमध्ये प्रामुख्याने संतवाङ्गमय संशोधन व तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी विविध तज्ञांकडून शिक्षण व संशोधन प्रकल्प हाती घेणे.
   ज्याला जे संतवाङ्गमय शिकण्याची इच्छा असेल, ते शिकता यावे; या दृष्टीने विविध विषय शिकवण्यात येतील. तसेच हिंदुधर्मातील स्तोत्रे,
   सूक्ते, पवमान, रुद्रपठण, इ. तसेच प्रामुख्याने श्रीदासबोध, श्रीगीता, श्रीएकनाथी भागवत, श्रीज्ञानेश्वरी, श्रीयोगवासिष्ठ या ग्रंथांवर
   अभ्यासवर्ग घेण्यात येतील. त्याच्यावर परीक्षा आयोजित करून प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच विविध डिप्लोमा, डिग्री अभ्यासक्रम
   पण आयोजित केले जातील.
४. संतांची शिकवण, प्रचार व प्रसार करण्यासाठी विविध गावी तत्वज्ञान व संत साहित्य अभ्यासकांची व्याख्याने, प्रवचने, वासंतिक वर्ग,
   शिबिरे आयोजित करण्यात येतील.
५. ज्ञानपीठातील विविध संशोधनाव्दारे सिध्द होणारे अभ्यासपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले जातील. तसेच संत संदेश घरोघरी
   पोचवण्यासाठी संतवाङ्गमय अल्प किंमतीत उपलब्ध करून दिले जाईल.
६. संतवाङ्गमयाचा प्रचार व प्रसार करणाऱ्या कीर्तनकार व प्रवचनकार यांचा यथोचित सत्कार करणे.
७. अध्यात्मिक कीर्तने व प्रवचने यांचे ऑडिओ व व्हिडीओ रेकॉर्डिंग्स जतन करून अभ्यासकांना उपलब्ध करून देणे.
८. वारकरी, नारदीय कीर्तन, प्रवचन यांचे शिक्षण व गुरुकुल पध्दतीचे शिक्षण व संवर्धन करणे.
९. कालमान बदलानुसार संस्थेचा सुयोग्य प्रचार व प्रसिध्दी होणे, यासाठी अध्यात्म/ तत्वज्ञान/ संशोधन/ संत संप्रदाय/ वारकरी
   संप्रदायातील मार्गदर्शक तसेच सामाजिक काम करणाऱ्या संस्थाचालकांना संस्थेत आणून संस्थेच्या कार्याचा समग्र परिचय
   करून देणे व संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे.

१. संतवाङ्गमय, वेद, पुराणे, उपनिषदे, विद्या, कला, हिंदू धर्मातील तत्वज्ञान, श्रीदासबोध, श्रीभगवद्‍गीता, श्रीएकनाथी भागवत
   यांची पुस्तके व हस्तलिखिते एकत्र करणे, जतन करणे व डिजिटलायझेशन करून e-Library निर्माण करणे.
   * e-Library अभ्यासकांना प्रथम इंट्रानेटद्वारे आणि नंतर इंटरनेटद्वारे उपलब्ध करणे.
२. जगभरातील ई-लायब्ररीज् ला जोडून माहितीचा दुर्मिळ साठा एका पोर्टलवर उपलब्ध करून देणे.
३. संतवाङ्गमय संशोधन व अभ्यासासाठी विविध तज्ञांकडून प्रकल्प हाती घेणे, शिक्षण देणे, व प्रमाणपत्र,
   डिप्लोमा व डिग्री अभ्यासक्रम आयोजित करणे.
४. संत साहित्य प्रचारासाठी विविध गावी व्याख्याने, प्रवचने, शिबिरे आयोजित करणे.
५. संशोधनातून सिद्ध ग्रंथ प्रकाशित करणे व संतवाङ्गमय अल्प किंमतीत उपलब्ध करून देणे.
६. कीर्तनकार व प्रवचनकारांचा सत्कार करणे.
७. अध्यात्मिक कीर्तने व प्रवचने यांचे ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग्स जतन करणे.
८. वारकरी, नारदीय कीर्तन व प्रवचन यांचे शिक्षण व संवर्धन करणे.
९. संस्थेच्या प्रचारासाठी अध्यात्मिक व सामाजिक तज्ञांचे मार्गदर्शन घेणे व परिचय करून देणे.

Google Location

सद्‍गुरूंचा विश्वास निर्माण व्हावा, ह्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांनी सांगितलेले नीट ऐकून मनापासून करावे लागते; आणि शिवाय ते आपले म्हणून करावे लागते !

आपल्याला शुध्द सत्संग साधायचा आहे;
प्रत्येक क्षणाला तो मिळवायचा आहे.
"आपल्या आयुष्याचे पहिले ध्येय तेच असले पाहिजे; मग बाकीचे सगळे !"
असे जर निश्चयाने ठरवले, तरच ते साधेल.

श्रीसद्‍गुरुंचे आपल्याकडे सतत लक्ष असतेच;
आपलेच त्यांच्याकडे लक्ष नसते.
प्रसंगांनीच आपल्याला त्यांच्या वात्सल्यमय पांघरुणाची जाणीव होत असते.

सद्‍गुरूंवर, श्रीभगवंतांवर पूर्णत्वाने सगळे सोपवले पाहिजे,पूर्ण शरणागती पत्करली पाहिजे. मग भले कितीही वाईट प्रसंग आले तरी चालतील; कितीही चांगले प्रसंग आले तरी चालतील. आणि हे जर जमले; तरच त्या प्रेमाचा वसंतोत्सव अनुभवता येईल.

श्रीभगवंतांचे अनुसंधान, त्यांचे नामसंकीर्तन हे केवळ त्यांच्यासाठीच व्हायला हवे. त्यांच्याशिवाय त्यात इतर काहीही, एवढेसेही यायला नको. नाही तर आपले 'मी-माझे' सुटणारच नाही.

संसार हा एकाच गोष्टीसाठी चांगला; की संसार करता करताच सगळ्या परीक्षा होऊन जातात. मग परमार्थासाठी वेगळया परीक्षांना बसायची जरुरी नसते.

कुठल्या रूपाने श्रीभगवंत समोर येतील, माहित नाही! म्हणून समोर आलेल्या प्रत्येकाशी चांगलेच वागावे, नीटच वागावे. येणाऱ्याचे स्वागतच करावे; आपण अगदी त्याला ओळखत असलो तरी सुद्धा!

एखादी गोष्ट जर सोडायची असेल तर ते इतके सोपे नसते. आपण सोडू सोडू असे नुसते म्हणतो; मात्र ते सुटत नाही. पण जर कोणी दणका घातला तर मात्र ते लगेच सुटते. हा दणका कोण घालते? तर ते सद्‍गुरु घालतात; बरोबर योग्य वेळी घालतात. असा दणका मिळाला की, ती गोष्ट जागच्या जागी सुटते.

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

भाव हा नुसता येऊन भागत नाही, तर तो रुजावा लागतो.
तोही असा; की वाटेल ते झाले तरी माझे
सद्‍गुरूच बरोबर,श्रीभगवंतच बरोबर! त्यांनी सांगीतलेले वेद गीता हेच बरोबर!

हरिभजनाला, नामस्मरणाला उशीर करण्यात काही अर्थ नाही. जेवढा उशीर कराल, तेवढे आयुष्य हातातून निघून गेले असे समजायचे. म्हणून आपला एकही क्षण वाया जाणार नाही असा कसोशीने प्रयत्न तरी करायचा; म्हणजे निदान एक क्षण तरी मुखी नाम येईल.

आपल्या प्रत्येक कृतीमध्ये असे काही तरी
असावे की, जे श्रीभगवंतांना पोहचले पाहिजे.
.... आणि असे विचार येऊ लागले की समाजावे,
आपण अगदी योग्य दिशेला चाललो आहोत!

एक लक्षात ठेवा; कधीही, कितीही, कशीही कर्मे पुढे आली तरी ती नि:स्पृहपणे करायचा प्रयत्न करावा. शिवाय त्याच्यात दुसऱ्याला बुडवायचा चुकून सुद्धा विचार करू नये. जेवढा बुडवायचा विचार येईल, त्याच्या शंभर पटींनी भरावे लागेल हे लक्षात ठेवावे.

साधना जेव्हा मिळते तेव्हा; आपण जर लक्षात ठेवले असेल तर; असे आठवेल की, सद्‍गुरूंनी वेगळेच सांगितलेले असते आणि आपण मात्र ते ऐकूनही तिसरेच करत असतो.
शिवाय वर त्यांनाच विचारत असतो की; अहो आम्हांला अनुभव कसा नाही?

जितका साधनेचा निर्णय आपण पुढे ढकलू तितका आयुष्यातील वेळ वाया जात जाईल आणि आयुष्याच्या
शेवटी श्रीभगवंत काही भेटणार नाहीत. मग शेवटी त्यांचे नाम आठवणार नाही किंवा रूपही आठवणार नाही.

शांतपणे कर्मांचा उपभोग न घेणे
हे घातक ठरणारे असते.
पण तोच अलिप्तपणा जमला पाहिजे .

आपले कुठल्याही गोष्टींकडे दुर्लक्ष जरी झाले,तरी श्रीभगवंतच आपल्याला सांभाळून घेतात. ते आपल्याला कमीपणा येऊन देत नाहीत; कारण आपण त्यांचे नाम घेतोय ना? त्यांना तेच तर हवे असते. म्हणूनच कोठल्याही परिस्थितीत नामस्मरण सोडू नये.

Slider