श्री जैताई मातृगौरव पुरस्कार, २०२४


वणी येथील प्राचीन अशा जैताई देवस्थानाच्या वतीने, ‘वैशिष्ट्यपूर्ण समाज सेवेसाठी’ देण्यात येणारा ‘श्री जैताई मातृगौरव पुरस्कार’ २०२४, श्रीपाद सेवा मंडळ, पुणे येथील, श्री दत्तसंप्रदायचे अध्वर्यू, परमपूज्य सद्‍‍गुरु श्री मामासाहेब देशपांडे ह्यांचे शिष्योत्तम आणि उत्तराधिकारी, परमपूज्य सद्‍‍गुरु श्री शिरीषदादा कवडे यांना सादर प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह आणि रु. ५१ हजार रोख स्वरूपातील हा पुरस्कार प्रदान केल्यावर, श्री दादांनी, पुरस्काराच्या रकमेत, आपले रु. ४० हजार मिळवून जैताई देवस्थानाला सविनय साष्टांग प्रणिपात करून रु. ९१ हजाराची देणगी प्रदान केली.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Main Image
Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1 Thumbnail 1

Google Location

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.