|| श्री ||

देवशयनी आषाढी एकादशी, २०२६


शनिवार, दिनांक २५ जुलै २०२६ रोजी, रात्री ९.०० ते १०.३० या वेळेत ‘श्रीपाद निवास’, पुणे येथे, प्रतिवर्षीप्रमाणे ‘देवशयनी आषाढी एकादशी’ निमित्त आयोजित ‘अभंगगायन’ कार्यक्रम प.पू. सद्‌गुरु श्री दादा महाराज यांच्या मंगल उपस्थितीत अत्यंत भक्तिभावपूर्वक संपन्न झाला.

संक्षिप्त चलतचित्र

कार्यक्रमाची सुरुवात “सुंदर ते ध्यान” या भगवंताच्या स्वरूपाचे वर्णन करणाऱ्या अभंगाने करण्यात आली. त्यानंतर “महायोग पीठे” हे श्रीविठ्ठलांचे स्तुतीपर स्तोत्र सादर करण्यात आले. यानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव इत्यादी संतांच्या विविध भक्तिरसपूर्ण, भगवंताच्या गुणवर्णनाने परिपूर्ण अभंगांचे गायन पुढील क्रमाने करण्यात आले:

  • महायोगपीठे तटे – श्रीपांडुरंगाष्टकम्
  • चित्तीं तुझे पाय
  • आनंदाचा कंद
  • अवघे जेणे पाप नाशे
  • सार सार सार विठोबा
  • सदा माझे डोळां
  • काय नव्हें केले
  • अखंड जया तुझी प्रीती
  • मृत्युलोकी एक नगर
  • विठोबा रखुमाई
  • माझ्या वडिलांची मिरासी
  • चला आळंदीला जाऊ
  • सर्व सुखाची लहरी
  • वासुदेवस्मरण
  • नामसंकीर्तन साधन पैं सोपे
  • कैसी समचरणींची शोभा
  • संपदा सोहळा
  • कीर्तन चांग
  • इहलोकींचा हा देहे
  • जय जय विठ्ठल
  • सुखालागी करिसी तळमळ
  • झळकती पताका
  • तू विटेवरी सखये बाई
  • विठ्ठला पांडुरंगा

सर्व साधकजन या अभंग गायनात समरस होऊन भक्तिरसात न्हाऊन निघाले. कार्यक्रमादरम्यान “जय जय राम कृष्ण हरि”, “विठोबा रखुमाई”, “जय जय विठ्ठल” अशा गजरांनी वातावरण भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण झाले.

कार्यक्रमाची सांगता आरती, मंत्रपुष्पांजली, परंपरा-स्मरण व तीर्थप्रसादाने करण्यात आली.

उत्सवातील काही क्षण चित्रे

Google Location

8

इंद्रियांशी खेळणे म्हणजे साक्षात अग्नीशी खेळणे आहे.
असे जर इंद्रियांशी खेळलात, तर ती तुमचा सर्वनाश करतील. जर या इंद्रियांवर ताबा हवा असेल व त्या भगवंतांजवळ जायचे असेल, तर सद्‍गुरूंना शरण जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.